Monday, September 15, 2008

गारवा

पाऊस पडून गेल्यावर, मन पागोळ्यांगत झाले शितिज्यच्या वाटेवरती पाण्यावर रांगत गेलेठेनबान्ना सावरलेल्या त्या गवतांच्या काडांचापाऊस पडून गेल्यावर, मी भिजलेल्या झाडांचापाऊस पडून गेल्यावर, मन थेंबांचे गारांचेआईस चकवूनी आल्या त्या डबक्यांतील पोरांचेमोडून मनाची दारे, येवुली पाऊल भरतीपाऊस पडून गेल्यावर, या ओल्या रस्त्यावरतीपाऊस पडून गेल्यावर, मी चंद्रचिंब भिजलेलाविझवून चांदण्या सार्‍या, विझलेला शांत निजलेलापाऊस पडून गेल्यावर, मन भिरभीरता पारवापाऊस पडून गेल्यावर, मन गारठता गारवा

No comments: